…तर दररोज तितकेच लसीकरण का नाही? सोनिया गांधींचा सवाल

  गेली दीड वर्षे कोरोनाने प्रत्येकाच्या घरापाशीच बस्तान ठोकले आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला, आपल्या कुटुंबियांचा जीव गमवावा लागला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच १०० कोटी लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. यादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी २ कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आले. […]

…तर दररोज तितकेच लसीकरण का नाही? सोनिया गांधींचा सवाल

  गेली दीड वर्षे कोरोनाने प्रत्येकाच्या घरापाशीच बस्तान ठोकले आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला, आपल्या कुटुंबियांचा जीव गमवावा लागला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच १०० कोटी लसीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. यादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी २ कोटींहून अधिक लसीकरण करण्यात आले. तर दररोज तितकेच लसीकरण का होत नाही? तसेच कोरोना विरोधातील लढाईला मोदी सरकार इव्हेंट मॅनेजमेंटची संधी का समजत आहे?’ असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

  काँग्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘हम कैसे भूल जाएंगे वो दौर’ या लेखातून मोदी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सोनिया गांधी म्हणाल्या, पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या दिवशी जर दोन कोटींपेक्षआ अधिक लसीकरण होऊ शकते तर रोज तसे लसीकरण का होत नाही. तसेच त्यांनी या लेखात पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मोदी सरकारची तयारी नव्हती, असेही त्या म्हणाल्या.

  ‘केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मोदी सरकारने बेजबाबदारपणा दाखवल्यामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागाला आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकराने अवलंबवलेले धोरण दुर्दैवी आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केंद्र सरकारने केलेल्या चुकांचा फटका देशाला सहन करावा लागत आहे, असेही त्या म्हणाल्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number