‘… तर परिणाम वाईट होतील’

भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीसांबद्दलच्या ‘फडतूस गृहमंत्री’ या वक्तव्यावर नारायण राणे यांनी ‘परत बोलला तर त्याचे परिणाम वाईट होतील’, असा धमकीवजा इशाराही उद्धव ठाकरेंना दिला आहे.  ‘…तर परिणाम वाईट होतील’ ‘उद्धव ठाकरेंच्या काळाचत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा झाले’, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. “उद्धव […]

‘… तर परिणाम वाईट होतील’

भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीसांबद्दलच्या ‘फडतूस गृहमंत्री’ या वक्तव्यावर नारायण राणे यांनी ‘परत बोलला तर त्याचे परिणाम वाईट होतील’, असा धमकीवजा इशाराही उद्धव ठाकरेंना दिला आहे.

 ‘…तर परिणाम वाईट होतील’

‘उद्धव ठाकरेंच्या काळाचत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा झाले’, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले आहे. “उद्धव ठाकरेच महाफडतुस आहेत. त्यांनी अडीच वर्ष स्वतः काही काम केलेलं नाही, केवळ खुर्चीत बसून राहिले, परत बोलला तर त्याचे परिणाम वाईट होतील”, असे वक्तव्य करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला आहे.

‘मोदींबाबत बोलण्याची तुमची लायकी आहे का ?’

“माजी मुख्यमंत्री आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांवर बोलतात, देशाच्या पंतप्रधानांविषयी बोलण्याची त्यांची लायकी आहे का ? “कोण आहात तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र ही ओळख सोडली तर देश आणि राज्याच्या विकासात तुमचं कर्तृत्व काय ?

‘शिवसेनेच्या विकासात योगदान काय ?’

” बाळासाहेबांच्या नखाचीही सर त्यांना नाही. उद्धव ठाकरे या शेम्बड्या माणसाचा काय घणाघात ? हा माणूस काय घणाघात करेल ?

शिवसेना तुझ्यामुळे वाढली असं कोणीही म्हणत नाही” “बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि शरद पवार यांच्या मेहेरबानीमुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात”, असे वक्तव्य करत “शिवसेनेच्या विकासात तुमचं योगदान काय ?” असा सवाल नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

काय बोलले होते उद्धव ठाकरे ?

मंगळवारी ( ४ एप्रिल ) रोजी उद्धव ठाकरे यांनी “महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय.” “ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जात आहे, मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरील या वक्तव्यामुळे नारायण राणे यांनी बुधवारी ( ५ एप्रिल ) पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांचा खडा समाचार घेतला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number