‘…म्हणून माझी खासदारकी रद्द केली’

देशात लोकशाहीवर रोज आक्रमण होत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. अदानी यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते काय? मी पण विचारणे सोडणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती […]

‘…म्हणून माझी खासदारकी रद्द केली’

देशात लोकशाहीवर रोज आक्रमण होत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. अदानी यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाते काय? मी पण विचारणे सोडणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती होती, म्हणून माझी खासदारकी रद्द केल्याचे गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत? या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर भाजपने ओरड सुरु केल्याचे राहुल गांधी म्हणाले. संसदेत माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. मला कोणाही घाबरवू शकत नाही. माझ्यावर झालेल्या कारवाईने मी घाबरणार नाही. मी संसदेत प्रश्न विचारले, माझ्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळाले नसल्याचे गांधी म्हणाले. अदानींच्या कंपनीत गुंतवलेले हजार कोटी रुपये कोणाचे ? अदानींना हजार कोटी कोणी दिले? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. या सर्व प्रश्नांची उत्तर हवी असल्याचे गांधी म्हणाले.

‘भारतात लोकशाहीवर सतत आक्रमण’, ‘अदानींच्या कंपनीत 20 हजार कोटी कुणी गुंतवले?’,’शेल कंपनीत 20 हजार कोटी कुणाचे’,’मोदी आणि अदानींचं नातं जुनं’, ‘मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून संबंध’,’अदानींना नियमबाह्य एअरपोर्ट दिले’,’मी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं’,’माझ्याविरोधात खोटं बोलण्यात आलं’,’खोट्या आरोपांबद्दल मी अध्यक्षांना बोललो’, ‘मी परदेशातून मदत मागितल्याचं खोटं सांगितलं’,’मी या लोकांना घाबरत नाही’, ‘मला धमकावून माझं तोंड बंद होणार नाही’, राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर आरोप केले.

या देशानं मला सर्वकाही दिलं आहे. देशानं मला प्रेम, सन्मान हे सर्व दिल्याचे राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध जगासमोर आणणार असल्याचे गांधी म्हणाले. खासदारकी रद्द केली तरी मी घाबरणार नाही. माझं नाव गांधी आहे. मी कोणाची माफी मागणार नाही. गांधी कधी माफी मागत नाहीत. माफी मागायला मी सावरकर नाही असेही राहुल गांधी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number