वृत्तसंस्था, उत्तर प्रदेश
गारुडीचा खेळ पाहायला आपणा सर्वांनाच आवडतो. गावांत, खेड्यापाड्यांत गारुडीचा खेळ पाहायला मिळतो. गारुडीच्या खेळात गारुडी आणि साप या दोघांमध्ये एक वेगळेच नाते पाहायला मिळते. या खेळामध्ये साप गारुडीच्या सर्व सूचना पाळतो. जणू तो त्याचा मालकच आहे. हे सर्व बघायला खूप गमतीदार वाटते. पण, उत्तर प्रदेशमध्ये गारुडीचा खेळ एका गारुड्याला चांगलाच महागात पडलाय.
उत्तर प्रदेशमध्ये गारुडीचा खेळ सुरु असताना अचानक अजगराननं गारुड्याचा गळा आवळला आणि बघता-बघता गारुडी जमिनीवर कोसळला. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. रस्त्याच्या कडेला हा गारुडी अजगराचा खेळ दाखवत होता. यावेळी अजगराने गारुड्याच्या गळ्याला वेढा घातला. यात गारुडी जमिनीवर कोसळला. हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.