स्मृती इराणी यांचं आधी ‘ते’ वक्तव्य, आणि आता ‘ही’ इन्स्टाग्राम पोस्ट!

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काही दिवसांपूर्वी शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरुन त्यांच्यावर विरोधकांनी आणि सामान्यांनीही आगपाखड केली होती. केंद्रीय पदावरील महिलामंत्री महिलांच्याच बाबतीत असे वक्तव्य करते यावरुन त्यांच्यावर राग व्यक्त केला जात होता. यावर स्मृती इराणी यांनी स्वतःच विरोधकांना उत्तर दिलं आहे. ते ही ‘इन्स्टाग्राम’वरून… स्मृती इराणी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला […]

स्मृती इराणी यांचं आधी ‘ते’ वक्तव्य, आणि आता ‘ही’ इन्स्टाग्राम पोस्ट!

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काही दिवसांपूर्वी शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरुन त्यांच्यावर विरोधकांनी आणि सामान्यांनीही आगपाखड केली होती. केंद्रीय पदावरील महिलामंत्री महिलांच्याच बाबतीत असे वक्तव्य करते यावरुन त्यांच्यावर राग व्यक्त केला जात होता. यावर स्मृती इराणी यांनी स्वतःच विरोधकांना उत्तर दिलं आहे. ते ही ‘इन्स्टाग्राम’वरून…

स्मृती इराणी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. त्यांच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील हा फोटो असून यामध्ये इराणी यांना दोरखंडाने बांधून ठेवलं आहे. तर त्यांचं तोंडही रुमालाने बंद करण्यात आलं आहे. या पोस्टवर त्यांनी लिहिलेलं कॅप्शन आहे- ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है’ आपल्या या पोस्टद्वारे त्यांनी ट्रोलर्सला उत्तर दिलंय.

 

View this post on Instagram
#hum bolega to bologe ki bolta hai… ???‍♀️ A post shared by Smriti Irani (@smritiiraniofficial) on

 

अवघ्या 2 तासांत त्यांच्या या इन्स्टाग्राम पोस्टला 6 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले. लाइक्सचा अकडा 15 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांना आपल्या ‘तुलसी’च्या भूमिकेतून आता बाहेर या असा टोला लगावला आहे.

मात्र आधी केलेल्या वक्तव्याची स्मृती इराणी या फोटो आणि पोस्टच्या माध्यमातून पाठराखणच करत असल्याचं दिसत आहे.

“रक्ताने माखलेले सॅनिटरी पॅड्स तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी न्याल का?” असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांच्यावर सर्वच स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

संबंधित बातम्या-

“रक्ताने माखलेलं सॅनिटरी नॅपकिन घेऊन तुम्ही मंदिरात कसं जाणार?”- स्मृती इराणी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number