लोकल ट्रेनच्या चाकातून निघाला धूर

मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानका जवळ मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या कसारा लोकलच्या चाकातून अचानक धूर निघू लागल्याने सदर लोकल ला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी ट्रेन मधून उड्या मारल्या, याबाबत ची माहिती काही प्रवाशांनी तात्काळ आसनगाव स्टेशन मास्तर यांना दिली, परंतु चाकरमानी प्रवाशी यांनी रेल्वे ट्रॅक मधून चालत आसनगाव स्थानक गाठले, सुदैवाने कोणती ही जीवित हानी झाली […]

लोकल ट्रेनच्या चाकातून निघाला धूर

मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानका जवळ मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या कसारा लोकलच्या चाकातून अचानक धूर निघू लागल्याने सदर लोकल ला आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी ट्रेन मधून उड्या मारल्या, याबाबत ची माहिती काही प्रवाशांनी तात्काळ आसनगाव स्टेशन मास्तर यांना दिली, परंतु चाकरमानी प्रवाशी यांनी रेल्वे ट्रॅक मधून चालत आसनगाव स्थानक गाठले, सुदैवाने कोणती ही जीवित हानी झाली नाही.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चाकाला लागलेली आग विझविल्यानंतर लोकल पुढे रवाना झाली. ब्रेकच्या अति घर्षणामुळे चाकाला चिकलेल्या प्लास्टिकने पेट घेतला असावा किंवा लोकलचा ब्रेक जाम झाल्याने आग लागली असावी. मात्र, या घटनेमुळे लोकल सेवा विलंबाने धावत होती, असे कल्याण – कसारा रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यात येत असून अद्याप नियंत्रण कक्षाला कोणताही अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कल्याण- कसारा-सीएसएमटी ८.१८ वाजताच्या अतिजलद लोकलला गुरुवारी सकाळी आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ अचानक आग लागली. प्रवाशांनी केलेला ओरडा, गार्डच्या लक्षात येताच तात्काळ लोकल आसनगाव स्थानका जवळील पादचारी पुलाजवळ थांबविण्यात आली. लोकलच्या डब्या खालील चाकांमधून धूर आणि तेवढ्याच भागात आग लागली होती. आगीचे स्वरुप लहान असल्याने दोन ते तीन प्रवाशांनी धाडस करुन जवळील पाण्याच्या बाटल्यांमधील पाणी आगीवर फेकले. त्या पाण्याच्या माऱ्याने आग विझली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number