Sleep Divorce: जोडप्यांसाठी स्लीप डिवोर्स फायदेशीर असतो का? जाणून घ्या

शरीर निरोगी राहण्यासाठी झोप अत्यंत महत्वाची भूमिका साकारते. चला जाणून घेऊया काय आहे 'स्लीप डिव्होर्स'. 

Sleep Divorce: जोडप्यांसाठी स्लीप डिवोर्स फायदेशीर असतो का? जाणून घ्या

शरीर निरोगी राहण्यासाठी झोप अत्यंत महत्वाची भूमिका साकारते. नियमित झोपेमुळे आपले शरीर दिवसभर फ्रेश आणि तजेलदार राहते. त्यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रत्येकाने किमान 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. अशातच, प्रत्येकजण अनोख्या पद्धतीने झोपतात. एका जोडीदाराला झोपेमध्ये घोरण्याची सवय असते, तर दुसऱ्या जोडीदाराला झोपताना शांतता हवीहवीशी वाटते. पण पहिल्या जोडीदाऱ्याच्या घोरणाऱ्या आवाजामुळे दुसऱ्या पार्टनरची झोप उडू शकते. या कारणांमुळे, दोघांमध्ये जोरदार भांडण तर होतातच, पण त्यासोबतच त्यांचे आरोग्यदेखील बिघडते. चला जाणून घेऊया काय आहे 'स्लीप डिव्होर्स'. 

'स्लीप डिवोर्स' (Sleep Divorce) म्हणजे नक्की काय? 

स्लीप डिव्होर्स म्हणजे दोन जोडीदार वेगवेगळ्या खोलीमध्ये झोपणे. यामुळे दोन्ही जोडीदारांची झोपदेखील पूर्ण होईल आणि झोपेवर परिणाम देखील होणार नाही. 

                 अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिनच्या मते, 'एक तृतीयांश अमेरिकन लोक काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्या जोडीदारापासून वेगळे झोपतात. यामुळे दोन्ही जोडीदारांना चांगली झोप लागते आणि आरोग्यदेखील चांगले राहण्यास मदत करते'. 

हेही वाचा: गरोदरपणात स्वतःची काळजी कशी घ्यावी? पाहाच

'स्लीप डिवोर्स' (Sleep Divorce) चे आश्चर्यकारक फायदे:

स्लीप डिव्होर्स घेतल्यामुळे पुरेशी झोप मिळते. त्यासोबतच ताणतणावदेखील कमी होते. स्लीप डिव्होर्समुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि विचार करण्याची क्षमतादेखील वाढवते. एनसीबीआयवर 9 सप्टेंबर 2017 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, 'एक तास कमी झोपल्यामुळे, हृदयविकाराचा धोका 6 टक्क्यांनी वाढतो'. 

भारतात स्लीप डिव्होर्स घेणाऱ्यांची संख्या अधिक:

एका सर्वेक्षणानुसार, स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड सर्वाधिक असून, भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. येथे 78% जोडपी हा ट्रेंड फॉलो करत आहेत. पुरुषांपेक्षा महिलांना झोपण्याची समस्या जास्त आहे. एवढेच नाही तर झोपेचा सर्वात जास्त त्रास कशामुळे होतो हे देखील या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 
                 जोडीदाराचे घोरणे, अस्वस्थता (12%), झोपेचे खराब वेळापत्रक (10%) आणि अंथरुणावर पडद्याचा वापर (8%) यांचा समावेश होतो. एका सर्वेक्षणानुसार, स्लीप डिव्होर्सच्या बाबतीत चीन 67% सह दुसऱ्या स्थानावर आहे आणि दक्षिण कोरिया 65% सह तिसऱ्या स्थानावर आहे.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number