मंगेश तावडे, जय महाराष्ट्र वेब न्यूज, गुहागर
गुहागर तालुक्यातील कोंड कारुळ येथे अवघ्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उजेडात आली आहे.
या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारे दोन्ही नराधमही अल्पवयीन आहेत.
त्यांच्या या प्रकारामुळे या परिसरासह गुहागर तालुक्यातुन संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुलांमध्ये मोबाईल व टीव्हीचे वाढलेले फॅड या घटनेसाठी कारणीभूत असल्याची चर्चा होत आहे.
हे दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्यामुळे या प्रकार बाबत सावधगिरी बाळगत गुहागर पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तर गुहागर तालुक्यात या महिन्यातील दूसरी घटना घडल्याने आता मुलांमध्ये जनजागृती करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.