राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक ओमायक्रॉन विषाणूचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉनच्या रुग्णाची संख्या आता आठवर पोहचली आहे.
महाराष्ट्रातील मुंबई येथील कल्याण-डोंबिवलीमध्ये एक नागिरकाला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये सहा तर पुण्यात एक ओमायक्रॉन विषाणूचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत वाढ झाली असून ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता आठवर पोहचली आहे.
सर्वप्रथम कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. त्यानंतर शनिवारी गुजरातमधील जामनगरमध्ये ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण आढळला होता. आणि आज कल्याण-डोंबिवलीमध्ये एक, पुण्यात एक आणि पिंपरी चिंचवडमध्ये सहा ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉन विषाणूची संसर्ग क्षमता जास्त असल्याने आरोग्य यंत्रणाही काळजीत आली आहे.
ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने ऍक्शन प्लान तयार केला आहे. तसेच मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे तसेच प्रत्येकाने लसीकरण घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.