कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या १५ दिवसांपासून धो- धो पाऊस सुरु आहे, काही ठिकाणी तर पूर देखील येऊन गेलेत मात्र. सोलापुरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन काही व्यवस्थित बसत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका सुरळीत पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरत आहे. या सगळ्या माघे पंपांवरचा होणार वीज खंड हे एकाच कारण समोर केलं जात आहे. पाणी नसल्याने वीज पुरवठा होत नाही असं सरळ उत्तर महापालिकेने नागरिकांना दिले आहे.
मात्र पाणी जीवनावश्यक असल्याने त्यासाठी शाळेतील मुलेही शाळेत न जात पाणी भरण्याच्या कामाला लागली आहेत, पाणी भरण्याच्या नादात तीन मुलांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे. पाणी कमी दाबाने सोडल्यामुळे त्यासाठी मोटरचा वापर करावा लागतो आणि मोटर कशी वापरावी याच ज्ञान नसल्यानेही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अशी माहिती आहे.
नागरिकांडी या सगळ्या समस्यांना कंटाळून अनेकदा शासनाकडे सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र शासन या समस्येकडे कान डोळा करताना दिसत आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना सोलापूर शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याची विनंती केली आहे.