‘टाईम स्क्वेअर’वर झळकली अभिनेत्याची लेक

मुंबई, १२ जुलै २०२३, प्रतिनिधी : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. पण आता मात्र महेश बाबूची लेक बरीच चर्चेत आली आहे. याच कारणही तसेच आहे, महेश बाबूची लेक सितारा ही काही दिवसांपूर्वी टाइम्स स्क्वेअरवर झळकली. तिने एका दागिन्यांच्या ब्रँडसाठी फोटोशूट केले. जे न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आले […]

‘टाईम स्क्वेअर’वर झळकली अभिनेत्याची लेक

मुंबई, १२ जुलै २०२३, प्रतिनिधी : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. पण आता मात्र महेश बाबूची लेक बरीच चर्चेत आली आहे. याच कारणही तसेच आहे, महेश बाबूची लेक सितारा ही काही दिवसांपूर्वी टाइम्स स्क्वेअरवर झळकली. तिने एका दागिन्यांच्या ब्रँडसाठी फोटोशूट केले. जे न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर दाखवण्यात आले होते. त्यामुळे सध्या समाज माध्यमांवर तिचे भरपूर कौतुक केले जात आहे.

 
View this post on Instagram
  A post shared by sitara ? (@sitaraghattamaneni)

अभिनेता महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा ही वयाच्या 11 व्या वर्षी टाइम्स स्क्वेअरवर झळकली. सिताराने एका दागिन्यांच्या ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे या ब्रँडची सितारा ही अॅम्बेसेडरही असून या ब्रँडच्या फोटोशूटसाठी सिताराने चक्क एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

 
View this post on Instagram
  A post shared by sitara ? (@sitaraghattamaneni)


सिताराचे हे फोटोशूट 4 जुलै रोजी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये दाखवण्यात आले होते. टाइम्स स्क्वेअरवरील सिताराचे हे फोटो सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number