जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईच्या सायन तलावात शेकडो मासे मृत अवस्थेत आढळलेत…या माशांच्या मृत्यूचं कारण बदललेलं वातावरण , वाढलेली थंडी आणि पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता असल्याचं म्हटलं जातंय.
या माशांच्या मृत्यूला महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलाय.
तलावात घाणीचं साम्राज्य पसरल्याने या माशांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलंय. वारंवार तक्रारी करुनही पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.
त्यामुळे आता तलावातील उरलेले मासे जीवंत रहावे यासाठी तरी पालिका काही प्रयत्न करणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.