जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सायन येथील उड्डाणपूल मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाचा मार्ग आहे. हा मार्ग एप्रिल अखेरपासून दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार आहे. पुलाच्या बेअरिंग आणि जॉईंट दुरुस्तीचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी हा पूल बंद करण्याचा निर्णय रस्ते विकास प्राधिकरणाने घेतला आहे.
ठाणे आणि नवी मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱ्यांच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे प्रवाश्यांना यापुढे वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.
या पुलावर एकूण १७० बेअरिंग्ज बदलाव्या लागणार असल्याची माहिती रस्ते विकास प्राधिकरणाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.