Homeमहाराष्ट्र सिंहगड इंस्टिट्युटच्या 22 महाविद्यालयांमध्ये नव्या प्रवेशांवर बंदी
सिंहगड इंस्टिट्युटच्या 22 महाविद्यालयांमध्ये नव्या प्रवेशांवर बंदी
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे पुण्यातील सिंहगड इंस्टिट्युटचे शिक्षक वेतन मिळत नसल्याने आंदोलन करतायत, तर विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कासाठी लढत आहेत. सिंहगड संस्थेच्या बावीस महाविद्यालयात यंदा प्रवेशबंदी करण्यात आलीय. प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटेपर्यंत प्रवेशबंदीचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं घेतलाय. इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए अशा अभ्यासक्रमांचा समावेश असलेल्या या शिक्षणसंस्थेतील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य काय हा […]
पुण्यातील सिंहगड इंस्टिट्युटचे शिक्षक वेतन मिळत नसल्याने आंदोलन करतायत, तर विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कासाठी लढत आहेत.
सिंहगड संस्थेच्या बावीस महाविद्यालयात यंदा प्रवेशबंदी करण्यात आलीय. प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटेपर्यंत प्रवेशबंदीचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं घेतलाय. इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए अशा अभ्यासक्रमांचा समावेश असलेल्या या शिक्षणसंस्थेतील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य काय हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहितोय.