ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना बिल्डरकडून 9 कोटींचा गंडा!

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची एका बिल्डरकडून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ‘मेसर्स ओम मंदार रिटेलर्स’ या बांधकाम व्यावसायिकानं ‘मंदार एव्हेन्यू’ नावाचा बांधकाम प्रकल्प उभारून ग्राहकांना आमिष दाखवत फ्लॅट्स विकले होते. मात्र प्रत्यक्षात त्याने एकच फ्लॅट 2 ते 3 जणांना विकला होता.  या प्रकरणात बनावट दस्ताऐवजांच्या आधारे […]

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना बिल्डरकडून 9 कोटींचा गंडा!

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची एका बिल्डरकडून फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
‘मेसर्स ओम मंदार रिटेलर्स’ या बांधकाम व्यावसायिकानं ‘मंदार एव्हेन्यू’ नावाचा बांधकाम प्रकल्प उभारून ग्राहकांना आमिष दाखवत फ्लॅट्स विकले होते. मात्र प्रत्यक्षात त्याने एकच फ्लॅट 2 ते 3 जणांना विकला होता. 

या प्रकरणात बनावट दस्ताऐवजांच्या आधारे एक फ्लॅट अनेकांना विकून आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकल्पात अनुपाधा पौडवाल यांनी 2 फ्लॅट खरेदी केले होते. मात्र बिल्डरनं एक फ्लॅट अनुराधा पौडवालांच्यासह 2 ते 3 जणांना विकून फसवणूक केली आहे. अनुराधा पौडवाल यांची सुमारे 9 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचा अरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number