दिंडोशीत 40 फूट खोल खड्यात पडूनही मुलगा बचावला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईतल्या दिंडोशीत भागात 10 वर्षीय चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावल्याची घटना घडलीय. चिमुरडा तब्बल 40 फूट खोल खड्ड्यात पडला होता. जवळपास 9 तास चिमुरडा खड्यात अडकला होता. अखेर पोलीसांच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे या लहानग्या मुलाला मदत मिळाली आणि त्याचा जीव वाचला. दिंडोशीतील ही घटना होळीच्या दिवशीची आहे. मुलगा त्यांच्या मित्रांसोबत राहत्या इमारतीच्या गच्चीवर होळी […]

दिंडोशीत 40 फूट खोल खड्यात पडूनही मुलगा बचावला

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतल्या दिंडोशीत भागात 10 वर्षीय चिमुरडा आश्चर्यकारकरित्या बचावल्याची घटना घडलीय. चिमुरडा तब्बल 40 फूट खोल खड्ड्यात पडला होता. जवळपास 9 तास चिमुरडा खड्यात अडकला होता. अखेर पोलीसांच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे या लहानग्या मुलाला मदत मिळाली आणि त्याचा जीव वाचला.

दिंडोशीतील ही घटना होळीच्या दिवशीची आहे. मुलगा त्यांच्या मित्रांसोबत राहत्या इमारतीच्या गच्चीवर होळी खेळत होता. होळी खेळत असताना अचानक तोल जावून तो 40 फूट खोल खड्यात पडला.

आजूबाजूला होळी खेळत असलेल्या जमावाचे लक्ष गेल्याने तेथे एकच गोंधळ उडाला आणि चिंतेच वातावरण निर्माण झालं. लोकांनी तात्काळ पोलीसांना बोलावलं. अखेर पोलीसांच्या तब्बल 9 तासांच्या अथक प्रयत्नांनी चिमुरड्याला बाहेर काढण्यात यश आलं. या सर्व प्रकरणाने पुन्हा एकदा मुंबई पोलीसांच्या सतर्कतेच दृश्य आपल्याला पहायला मिळालं.

WhatsApp_Image_2018-03-03_at_8.48.21_AM.jpeg

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number