जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
महाराष्ट्राच्या माई अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांना मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. नाताळनिमित्ताने सलग लागून आलेल्या सुट्टया तसेच, विकेंडमुळे मुंबई गोवा मार्ग, मुंबई पुणे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळतयं. काही ठिकाणी तर वाहतूकीची मोठी कोंडी होत असल्याने चार ते पाच तास वाहने चालू अवस्थेत संथ गतीने सरकत आहेत.
रायगड येथील कार्यक्रम आटोपून सिंधुताई पुण्याकडे परत जात असताना खोपोली येथून सुरू होणाऱ्या घाट रस्त्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडीत त्या अडकल्या. आणि त्याचवेळी त्यांच्या वाहनाच्या क्लच फ्लेटमध्ये बिघाड झाला. यात त्यांचे सहकारीही अडकून राहिले. त्यानंतर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी असणाऱ्या ग्रुपशी संपर्क साधून त्यांना वाहतूक कोंडीमधून बाहेर काढण्यात आले.