जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग
ओखी चक्रीवादळाचा सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर मोठा प्रभाव दिसून येतोय. सिंधुदुर्गच्या समुद्रातील पोलिसांची एक गस्ती नौका बाहेर काढली.
सिंधू 2 नौका बाहेर काढण्यात यश आलंय. तर, सिंधू 5 नौका बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुद्रात वादळसदृश परिस्थिती जाणवू लागताच सिंधुदुर्गसह केरळ, कर्नाटक, तामिळनाडूच्या बोटींनी देवगड बंदराचा आसरा घेतला होता.
तर, गुजरातच्या देखील बोटी देवगड बंदर येथे आश्रयाला आल्या आहेत. 300 हुन अधिक बोटी आलेल्या आहेत. एकूण सर्व बोटी पकडून 5 हजार बोटी देवगड बदरात आश्रयाला आहेत त्यामुळे देवगड बंदर क्षमता संपली आहे.
मालवण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असतानाच रात्रीपासून समुद्राला उधाण आले. यामुळे समुद्राच्या मोठ्या लाटा किनार्यावर धडकत आहेत.