जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षाला रौप्यपदक

मेक्सिकोतील लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मनमाड येथील आकांक्षा किशोर व्यवहारे हिने भारतासाठी रौप्यपदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आकाक्षांने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४० किलो वजनी गटात भारतासाठी ५९ किलो स्नॅच व ६८ किलो क्लिन जर्क असे १२७ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे. आकांक्षा ही गुरू गोविंद सिंग हायस्कूल तसेच जय भवानी […]

जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या आकांक्षाला रौप्यपदक

मेक्सिकोतील लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये मनमाड येथील आकांक्षा किशोर व्यवहारे हिने भारतासाठी रौप्यपदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आकाक्षांने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४० किलो वजनी गटात भारतासाठी ५९ किलो स्नॅच व ६८ किलो क्लिन जर्क असे १२७ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले आहे.

आकांक्षा ही गुरू गोविंद सिंग हायस्कूल तसेच जय भवानी व्यायामशाळेची विद्यार्थिनी आहे. अतिशय चुरशीच्या या लढतीत ५९ किलो स्नॅच, ६८ किलो क्लिन जर्क असे १२७ किलो वजन उचलून आकांक्षा हिने हे पदक पटकावले आहे. वेटलिफ्टिंगमध्ये अनेक स्टार खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांची आकांक्षा ही पुतणी आहे. आकांक्षा आणि प्रशिक्षक म्हणून तृप्ती पाराशर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग दुसऱ्यांदा समस्त मनमाडकर आणि महाराष्ट्रसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेल रौप्यपदक ही समस्त भारतीय व महाराष्ट्रातील महिला खेळाडूंना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number