ओडिशाच्या बालासोर येथील बहनगा बाजार स्थानकावर २ जून रोजी झालेल्या तीन ट्रेनच्या ढिगाऱ्याचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या पथकाने मंगळवारी रेल्वे सिग्नल युनिटमधील एका कनिष्ठ अभियंत्याची चौकशी केली, ज्यामध्ये २९२ लोकांचा मृत्यू झाला हा अपघात सिग्नलिंग सिस्टममध्ये मानवी हस्तक्षेपातून छेडछाड झाल्यामुळे झाला होता. या अपघातामागे मानवी षडयंत्र असल्याचं समोर आल्यानंतर आता सीबीआय पुढील तपास करीत आहे.
भुवनेश्वर – ओडिशात बालासोर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या रेल्वे दुर्घटनेनं सगळा देश हादरला होता. तीन रेल्वेंमध्ये झालेल्या या भीषण अपघातात अनेकांचा जीव गेला. अजूनही काही प्रवासी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणाचा तपास सीबीआय करते आहे. या सगळ्या अपघातात मानवी सहभाग आणि षडयंत्र असल्याचा संशय सीबीआयला आहे. अपघात स्थळाच्या जवळ असलेल्या सिग्नल यंत्रणेत जाणीवपूर्वक बिघाड करण्यात आला होता, हे तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी सिग्नल युनिटच्या एका ज्युनिअर इंजिनिअरची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचं घर सील करण्यात आलं असून त्याला ताब्यात घेण्यात आल आहे. सिग्नल प्रोटोकॉलचं उल्लंघन करण्यात आल्याचे पुरावे मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
या अपघातामागे मानवी षडयंत्र असल्याचं समोर आल्यानंतर आता सीबीआय पुढील तपास करीत आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यानीही हेच संकेत दिले आहेत. ब्रेडाऊनच्या दुरुस्तीसाठी इंटर लॉकिंग सिग्नलच्या डिजिटल सर्किटला मॅन्युअल करण्यात आले होते, अस अधिकाऱ्यांच म्हणणं आहे.