कॉंग्रेस नेते आणि वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी ओळखले जाणारे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यासोबत झालेल्या वादानंतर सिद्धू यांनी राजीनामा दिला असल्याचे म्हटलं जात आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी 10 जून रोजी राहुल गांधी यांना मंत्रीपदाचा राजीनामा सोपवला असल्याचे म्हटलं आहे.
पंजाबमधील कॉंग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सि्द्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली आहे.
सिद्धू यांनी 10 जून रोजी राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सोपवल्याचे समजते आहे.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्याचे कारण नवज्योत सिंग सिद्धू असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होते.
तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अमरिंदर सिंग यांनी केली होती.
या वादानंतरच नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्याचे म्हटलं जात आहे.