Homeमहाराष्ट्र तब्बल 5 दिवसांनंतर भाविकांना सिद्धिविनायकाचे दर्शन
तब्बल 5 दिवसांनंतर भाविकांना सिद्धिविनायकाचे दर्शन
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक मंदिर अखेर खुले करण्यात आले. शेंदुर लेपनामुळे गेल्या 5 दिवसांपासून बंद असलेलं सिध्दीविनायक मंदीर भक्तांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. शेंदुर लेपन प्रक्रीयेमुळे मुख्य गाभारा आणि मुख्य मुर्तीचं दर्शन भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आज गाभारा आणि मुख्य मुर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये […]
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धिविनायक मंदिर अखेर खुले करण्यात आले. शेंदुर लेपनामुळे गेल्या 5 दिवसांपासून बंद असलेलं सिध्दीविनायक मंदीर भक्तांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे.
शेंदुर लेपन प्रक्रीयेमुळे मुख्य गाभारा आणि मुख्य मुर्तीचं दर्शन भक्तांसाठी बंद ठेवण्यात आले होते. आज गाभारा आणि मुख्य मुर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतयं.