जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
अपडेट
शेवगावच्या शेतकऱ्यांचा संघर्ष यशस्वी
ऊसाला 2525 पहिली उचल मिळणार
शेतकरी, सरकारी अधिकारी, कारखानदारांच्या बैठकीत तोडगा
तेरा आंदोलक शेतकऱ्यांची जामिनावर सुटका
————————————————————————————————–
ऊसदरप्रश्नी आंदोलन चिघळलंय. ऊसदरासाठी शेतकरी आक्रमक झालेत. नगरमध्ये गाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आलीय.
अनेक शेतकरी नेत्यांनी रस्त्यात तळ ठोकलाय. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत गाड्या अडवल्यात. पाटेगाव, खानापूर, घोटण या मार्गावर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय.
ऊसाला 3 हजार 100 रुपये हमीभाव देण्याची मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत. शेतकरी महापंचायत पाहिल्यानंतर या शेतकऱ्यांनी जय महाराष्ट्रकडे आपल्या व्यथा मांडल्यात.
दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच लाठीमार आणि गोळीबारही केलाय. त्यात 2 शेतकरी जखमी झालेत.
दरम्यान शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप शेतकरी नेत्यांनी केलाय. तसेच सरकारनं दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशारा दिलाय.