वृत्तसंस्था, कन्नूर (केरल)
युपीच्या शुभांगी स्वरूपने रचला नवा इतिहास रचला आहे. शुभांगी इंडियन नेव्हीची पहिली महिला पायलट बनली आहे.
इंडियन नेव्हीमध्ये पहिल्यांदाच महिला पायलटची नियुक्ति करण्यात आली आहे. लवकरच शुभांगी मेरीटाइम रिकानकायसन्समधून विमानांचे उड्डाण करताना दिसणार आहे.
शुभांगी व्यतीरीक्त दिल्लीची आस्था सेगल, पाँडीचेरीची रूपा ए आणि केरळची शक्ति माया एस या नेव्हीच्या नेव्हल आर्मामेंट इंस्पेक्टोरेट (एनएआई) शाखेत पहल्या महिला अधिकारी बनल्या आहेत. या चौघींना नेव्हल ओरिएंटेशन कोर्स पास केल्यानंतर होणाऱ्या पासिंग आउट परेडमध्ये सहभाग घेतला. नौसेना प्रमुख एडमिरल सुनील लांबा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
या चारही महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या महत्वाच्या शाखांमध्ये प्रशिक्षण दिल्यानंतर ड्यूटीवर रुजू केले जाणार आहे.
तर, शुभांगीला हैदराबादच्या वायु सेना अकादमीत विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. येथेच सेना, नौदल आणि वायु सेनेचे पायलट यांना प्रशिक्षण दिले जाते.