NEET Paper Leak : NEET च्या पुनर्परीक्षेचा पेपरही फुटला; फिजिक्सच्या पेपरचे प्रश्न परीक्षेआधीच लीक झाल्याची मुंबई CBI कडे तक्रार

मुंबई : NEET चा पेपर फुटल्यानंतर देशभरात रणकंदन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा नीटचा आणखी एक फुटल्याची घटना समोर आली आहे. NEET च्या पुनर्परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप होत असून फिजिक्सचा पेपर फुटल्याचा दावा केला जात आहे. 45 पैकी 40 प्रश्न फुटल्याचे सांगितले जात आहे. गुजरातमधील शुभम ठक्कर याने मुंबई CBI कडे मेलद्वारे याबाबत तक्रार केली असून 21 जून रोजी NEET ची […]

NEET Paper Leak : NEET च्या पुनर्परीक्षेचा पेपरही फुटला; फिजिक्सच्या पेपरचे प्रश्न परीक्षेआधीच लीक झाल्याची मुंबई CBI कडे तक्रार

मुंबई : NEET चा पेपर फुटल्यानंतर देशभरात रणकंदन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा नीटचा आणखी एक फुटल्याची घटना समोर आली आहे. NEET च्या पुनर्परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप होत असून फिजिक्सचा पेपर फुटल्याचा दावा केला जात आहे. 45 पैकी 40 प्रश्न फुटल्याचे सांगितले जात आहे. गुजरातमधील शुभम ठक्कर याने मुंबई CBI कडे मेलद्वारे याबाबत तक्रार केली असून 21 जून रोजी NEET ची पुनर्परीक्षा होती. मात्र त्याच्या तीन दिवस आधीच 18 जून रोजी एका pdf च्या माध्यमातून पेपर लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी पूर्ण पेपर लीक नसून संबंधीत पेपरमधील प्रश्न हे एका कागदावर हाताने लिहिलेले होते, असा आरोप करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे लीग झालेल्या पेपरमध्ये प्रश्नांचा क्रमांक आणि पुनर्परीक्षेत आलेल्या पेपरमध्ये प्रश्नांचे क्रमांक हे वेगळे होते. परंतू पेपर कोड 80 – SUSHRUT मध्ये हे आढळून आले. त्याचसोबत बायोलॉजीमध्ये 45 पैकी 16 प्रश्न हे लीक झालेल्या पेपरमधून होते. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणणाऱ्या शुभम ठक्कर याने मुंबई CBI सह, NTA आणि गुजरातच्या DGP यांच्याकडे देखील मेलद्वारे तक्रार केलेली आहे.

हेही वाचा : Abhijeet Dipke Warns Government : ‘…तर पुन्हा मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल’ दीपकेंचा मोदी सरकारला थेट इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number