जय महाराष्ट्र, मुंबई
इतर सेलिब्रिटींप्रमाणे श्रुती हसन सुद्धा आपले पर्सनल लाइफ कॅमेऱ्यापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असते. पण आता तिची ही चोरी चोरी चुपके चुपके कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
टॉलीवूड क्विन श्रुती हसन सध्या चर्चेचा विषय बनली आहे. श्रुतीने आपल्या दिलखेच अदांनी बॉलिवूडमध्येही आपले स्थान कायम केले आहे.
अत्यंत धावपळीचे जीवन जगणारी श्रुती बुधवारी मुंबई एअरपोर्टवर आपल्या ब्रिटीश बॉयफ्रेंड मायकल कोर्सेली सोबत दिसली.
श्रुती सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीत आहे. आणि त्यासाठी तिचे सतत मुंबई ते चेन्नई येणे जाणे चालू आहे.
अशा बिझी शेड्यूल मध्ये असतांनाही बॉयफ्रेंड माइकल सोबत पुरेसा वेळ घालवण्यासाठी त्यांनी एअरपोर्टवर भेट घेतली आणि याच वेळी ते दोघे कॅमेऱ्यात कैद झाले.