दिल्ली ऐवजी देशाची राजधानी नागपूरला हलवा – श्री श्री रवीशंकर

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   दिल्लीतील हवा खराब आहे, त्यामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा असा सल्ला आध्यत्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी नागपूरात दिलाय. अयोध्या मुद्यावर श्री श्री रविशंकर उद्या सरसंघचालकांची भेट घेणार आहेत. नागपूरला का राजधानी बनवलं जाऊ नये? नागपूर देशाच्या बरोबर मध्यभागी आहे. सर्वांना येण्या-जाण्याला बरं पडेल. आधीही विचार झाला होता. आता तर […]

दिल्ली ऐवजी देशाची राजधानी नागपूरला हलवा – श्री श्री रवीशंकर

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

दिल्लीतील हवा खराब आहे, त्यामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा असा सल्ला आध्यत्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी नागपूरात दिलाय.

अयोध्या मुद्यावर श्री श्री रविशंकर उद्या सरसंघचालकांची भेट घेणार आहेत. नागपूरला का राजधानी बनवलं जाऊ नये? नागपूर देशाच्या बरोबर मध्यभागी आहे. सर्वांना येण्या-जाण्याला बरं पडेल. आधीही विचार झाला होता. आता तर आपले पंतप्रधान डायनॅमिक आहेत. ते करु शकतात, असे श्री श्री रविशंकर म्हणाले.

त्याचसोबत, नागपूरच नाही, तर नागपूरच्या बाजूलाही चालेल. एका नव्या पद्धतीने पूर्ण सृष्टी बनवावी लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. श्री श्री रविशंकर यांच्या वक्तव्यानंतर अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र श्री श्री रविशंकर यांना राजकीय नेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारंय

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number