जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
श्रीपाद छिंदमला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणावरून आता 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जामीन दिल्यावर छिंदम केव्हाही कारागृहाच्या बाहेर येऊ शकतो हे निश्चीत.
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमने जनक्षोभ उसळल्यावर व्हिडिओ प्रसारित करुन माफीनामा मागितला. छिंदमनं मी निर्दोष असून राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं अर्जात म्हटलं आहे. त्याचबरोबर, “मी घरातील एकमेव कर्ता पुरुष आहे. आई आजारी असून, दोन लहान मुले असल्यानं देखभालीसाठी जामीन मिळावा.”
सरकारी वकिलांनी जामिनाला तीव्र आक्षेप घेतला. छिंदम बाहेर आल्यास तपासावर दबाव आणण्याची आणि पुरावा नष्ट करेल अशी शक्यता वकलीलांनी वर्तवली होती. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकूण जामीन मंजूर केला आहे.
छिंदम सध्या नाशिक कारागृहात आहे. छिंदमची चौदा तारखेला कोठडी संपत होती. पोलिसांच्या वक्तव्यानुसार शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केलं गेल होतं. छिंदमवर वकिलांनी बहिष्कार टाकल्यानं त्यानं जामिनासाठी स्वतः अर्ज केला होता.
छिंदमवर तोफखाना पोलीस ठाण्यात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करुन सामाजिक तेढ निर्माण करणे, आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गुन्ह्यात छिंदमला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी दर रविवारी दोन ते तीन यावेळीत हजर राहण्यास आणि पुरावा नष्ट न करण्याचा अटीवर जामीन मंजूर केला आहे.