जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं. श्रीदेवींच्या मृत्यूमागील चौकशी पूर्ण झाल्यानंतर, त्यांचा मृत्यू हा अपघाती असल्याचे सिद्ध झाल्याने या खटल्याला पूर्ण विराम लावला आहे. मंगळवारी दुपारी त्यांचे पार्थिव कुटुंबियांकडे सोपवण्यात आले.
खासगी विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईत दाखल झाले. बुधवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्याआधी अंतिम दर्शनासाठी श्रीदेवी यांचे पार्थिव सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब मध्ये ठेवण्यात येणार आहे.
सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब, गेट क्रं. 5, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे सकाळी साडेनऊ ते साडेबाराच्या दरम्यान श्रीदेवी यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन चाहत्यांना घेता येईल. दुपारी दोनच्या सुमारास अंतयात्रा सुरू होणार आहे.
विलेपार्ले येथील पवनहंस परिसरातील स्मशानभूमीत, त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील.