श्रावणी सोमवार निमित्त शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने देशातील प्रमुख शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. 

श्रावणी सोमवार निमित्त शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यातील सोमवार हा श्रावणी सोमवार म्हणून ओळखला जातो. श्रावणी सोमवारच्या शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. यंदाच्या पहिल्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने देशातील प्रमुख शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. 

श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराचे दर्शन घेणे, व्रत म्हणून उपवास करणे, पांढरा पोशाख परिधान करणे, दान करणे यावर भाविकांचा भर आहे. ज्योतिर्लिंगाचे श्रावणी सोमवार निमित्त दर्शन घेण्याला विशेष महत्त्व आहे. हे शक्य नसल्यास भाविक जवळच्या शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. शिव मंदिरात जाऊन दीप अर्पण करणे, बेलाचे पान वाहणे हे उपचार करतात. 

ज्योतिर्लिंग

  1. सोमनाथ, गीर सोमनाथ, गुजरात
  2. मल्लिकार्जुन, श्रीशैल्य, आंध्र प्रदेश
  3. महांकालेश्वर, उज्जैन, मध्य प्रदेश
  4. ओंकारेश्वर, खांडवा, मध्य प्रदेश
  5. वैजनाथ, बीड, महाराष्ट्र
  6. भीमाशंकर, पुणे, महाराष्ट्र
  7. रामेश्वर, रामनाथपुरम, तामीळनाडू
  8. औंढा नागनाथ, हिंगोली, महाराष्ट्र
  9. विश्वेश्वर, काशी / वाराणसी, उत्तर प्रदेश
  10. त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र
  11. केदारनाथ, रुद्रप्रयाग, उत्तराखंड
  12. घृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग

  1. वैजनाथ, बीड, महाराष्ट्र
  2. भीमाशंकर, पुणे, महाराष्ट्र
  3. औंढा नागनाथ, हिंगोली, महाराष्ट्र
  4. त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र
  5. घृष्णेश्वर, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number