कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे व्यापारी नाराज

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन विषाणूमुळे राज्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच विना मास्क ग्राहक दिसल्यास दुकानदाराला १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या नियमामुळे व्यापारी वर्ग नाराज झाल्याचे दिसून आले आहे. दुकानात […]

कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे व्यापारी नाराज

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन विषाणूमुळे राज्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच विना मास्क ग्राहक दिसल्यास दुकानदाराला १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या नियमामुळे व्यापारी वर्ग नाराज झाल्याचे दिसून आले आहे.

दुकानात विना मास्क ग्राहक दिसल्यास दुकानदाराला १०  हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्यामुळे व्यापारी नाराज झाले आहेत. ग्राहकांच्या चुकीची शिक्षा दुकानदारांना मिळणार आहे, त्यामुळे व्यापारांना लागू केलेला दंड रद्द करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. दंड रद्द केला नाही तर आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा व्यापाऱ्यांनी शासनाला दिला आहे.

राज्यात नवी नियामावली लागू

ओमायक्रॉन विषाणूमुळे राज्यात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी नागरीकांचे पूर्ण लसीकरण असणे आवश्यक आहे. तसेच लसीच्या दोन डोसनंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य आहे. सार्वजनिक वाहतूक प्रवासासाठी युनिव्हर्सल पास ग्राह्य धरला जाणार आहे.

दुकाने आणि मॉल्समध्ये जाण्यासाठी नागरिकांनी लसीचे दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. दोन डोस घेतलेल्यांनाच रिक्षा, टॅक्सी, बस आणि कॅबमध्ये प्रवास करता येईल. लस घेतली नाही तर प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासांच्या आत आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी संख्येनुसार नियमावली तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक वागणूक अनिवार्य आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number