Crime News : वाळू तस्करीवरून दोन गटात तुफान राडा, शेतकरी अन् वाळू माफिया यांच्यात रंगला गोळीबाराचा थरार; नेमकं प्रकरण काय?

शेतकरी कृषी पंप चालू करण्यासाठी गेल्यानंतर वाळूमाफियांनी शेतकऱ्यावर गंभीर मारहाण करून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना घडली.<br/>

Crime News : वाळू तस्करीवरून दोन गटात तुफान राडा, शेतकरी अन् वाळू माफिया यांच्यात रंगला गोळीबाराचा थरार; नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू तस्करीवरून दोन गटात तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळाले. शेतातील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली असून त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना बेदम चोप देत मुख्य आरोपीला पकडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेतकरी जालिंदर कुंजीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते शनिवार, 23 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ते गोदावरी नदीकाठावरील शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेले असता नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आवाज दिल्यानंतर आरोपींनी त्यांना पकडून शिवीगाळ करीत लाकडी दांडके आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप कुंजीर यांनी केला आहे

हेही वाचा : Raigad Ambenali Ghat Accident: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात! तब्बल 500 फुट खोल दरीत कोसळली स्कॉर्पिओ; दुर्घटनेचं नेमकं कारण काय?

दरम्यान, गावकरी घटनास्थळी आल्यानंतर गावकरी आणि वाळूमाफियात जोरदार राडा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोपींनी बंदुकीतून दोन राऊंड फायर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. शेतकऱ्यावर हल्ला केल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मुख्य आरोपी अर्जुन दाभाडे याला पकडून मारहाण केली. याप्रकरणी अर्जुन दाभाडे, उद्देश मंडलिक, महेश गायकवाड, विकास उर्फ विकी ढमके, राहुल चव्हाण, विजय उर्फ भोगर हटांगळे, मंगेश साळवे, विजय पवार आणि राहुल थोरात अशा 9 जणांविरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number