जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा एका तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. भोसरी जवळील गवळीमाथा चौकात तरुणावर सकाळी साडे सहा वाजता हा गोळीबार झाला. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून चिंचवडच्या निरामय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
विजय पांडुरंग घोलप अस 34 वर्षीय गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या 24 तासातील ही दुसरी घटना आहे. शुक्रवारी पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील एका हॉटेलमध्ये संतोष जाधव या सराईत गुन्हेगारावर धारदार शस्त्राने हल्ला करून गोळीबार करण्यात आला होता. 24 तासात दोन गोळीबारांच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.