Crime News : खळबळजनक! प्रियकरासोबत राहण्यासाठी आईने पोटच्या मुलाला संपवलं; डोळ्यांत मिरची पूड टाकली अन्…

मतिमंद असलेल्या या बालकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असून, या घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. पोलिसांनी याप्रकरणी निर्दयी माता आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.<br/>

Crime News : खळबळजनक! प्रियकरासोबत राहण्यासाठी आईने पोटच्या मुलाला संपवलं; डोळ्यांत मिरची पूड टाकली अन्…

Crime News : आपल्या वासनेसाठी आणि अनैतिक संबंधांत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी एका मातेने आपल्याच पोटच्या 5 वर्षांच्या निष्पाप मुलाचा प्रियकराच्या मदतीने बळी घेतल्याची संतापजनक घटना तेलंगणात उघडकीस आली आहे. मतिमंद असलेल्या या बालकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असून, या घटनेने माणुसकीला काळिमा फासला आहे. पोलिसांनी याप्रकरणी निर्दयी माता आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?
कामारेड्डी शहरातील श्रीरामनगर कॉलनीमध्ये ही अंगावर शहारे आणणारी घटना घडली. पतीपासून विभक्त झालेली आरोपी महिला गेल्या सहा महिन्यांपासून नरसिमलु नावाच्या व्यक्तीसोबत 'लिव्ह-इन'मध्ये राहत होती. या महिलेला 8 वर्षांची मुलगी आणि 5 वर्षांचा श्रावण नावाचा मुलगा होता. श्रावण हा मतिमंद असल्याने त्याला विशेष आधाराची गरज होती, मात्र तोच आपल्या सुखात अडथळा ठरत असल्याची भावना या दोघांच्या मनात घर करून होती.

मिरची पूड टाकून डोक्यावर वार
या दोघांनी मिळून श्रावणचा काटा काढण्याचा कट रचला. घटनेच्या वेळी आरोपी नरसिमलु दारूच्या नशेत होता. मुलाने प्रतिकार करू नये किंवा त्याला काही दिसू नये, यासाठी आरोपीने प्रथम त्याच्या डोळ्यांत मिरचीची पूड फेकली. त्यानंतर लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केले. या भीषण हल्ल्यात चिमुरड्या श्रावणचा जागीच अंत झाला. विशेष म्हणजे, या संपूर्ण क्रूर कृत्यात मुलाच्या आईचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा – ED Raid: कोळसा घोटाळ्याप्रकरणी थेट उपायुक्तांच्या घरावर ईडीची धाड; केंद्रीय यंत्रणांच्या सलग कारवायांनी राजकारण तापले

पोलिसांची कारवाई आणि संताप
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. संशयावरून ताब्यात घेतलेल्या नरसिमलु आणि मुलाच्या आईने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या निर्घृण हत्याकांडाबद्दल कामारेड्डी परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number