Junnar News : तुम्ही खात असलेल्या आईस्क्रीममध्ये लपलंय विष? दूध, साखरेऐवजी घातक रसायनांचा वापर

आईस्क्रीम आणि कुल्फी खाणाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे. एका कारखान्यात दूध आणि साखरेऐवजी आरोग्यास घातक रसायनांचा वापर करून कुल्फी तयार केली जात असल्याचे उघड झाले आहे.

Junnar News : तुम्ही खात असलेल्या आईस्क्रीममध्ये लपलंय विष? दूध, साखरेऐवजी घातक रसायनांचा वापर

आईस्क्रीम आणि कुल्फी खाणाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे. एका कारखान्यात दूध आणि साखरेऐवजी आरोग्यास घातक रसायनांचा वापर करून कुल्फी तयार केली जात असल्याचे उघड झाले आहे.  या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कारखान्यावर तात्काळ कारवाई करून तो सील करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा- Badlapur Bakery : केक खाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की पाहा! खारीत उंदराचा वावर, केकमध्ये विष्ठा…; बदलापुरातील नामांकित बेकरीतून किळसवाणा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार,  जुन्नर तालुक्यातील ’14नंबर’ परिसरात बनावट आणि घातक रसायनांचा वापर करून तयार केल्या जाणाऱ्या एका कुल्फी आणि आईस्क्रीम कारखान्याचा भांडाफोड करण्यात आला आहे. स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून, या कारखान्यात दूध किंवा साखरेचा अजिबात वापर न करता केवळ घातक रसायने, लिक्विड डिटर्जंट आणि रंगासाठी थेट पेंटचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

​कारखान्यातील कामगार आणि मालक घटनास्थळावरून पसार झाले असून ‘संचिता कुल्फी’ (Sanchita Kulfi) या नावाखाली हे विषारी आईस्क्रीम बाजारात विक्रीसाठी पाठवले जात होते. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) याप्रकरणी कडक कारवाई करून हा कारखाना तात्काळ सील करावा, तसेच दुकानदारांनी या ब्रँडची कुल्फी विक्रीसाठी न ठेवता तात्काळ फेकून द्यावी, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number