धक्कादायक! पिंपरीत मुलीवर हातोड्याने हल्ला

पोलिसांत छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर हातोड्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपरीमध्ये घडली आहे. पिंपरीच्या या भयानक घटनेमुळे राज्यात दहशत पसरली आहे. पिंपरीमध्ये २७ जानेवारी रोजी गुरुवारी ही घटना घडली असून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास घेत, आरोपी शिवम विनोद शेळके याला […]

धक्कादायक! पिंपरीत मुलीवर हातोड्याने हल्ला

पोलिसांत छेडछाडीची तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर हातोड्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना पिंपरीमध्ये घडली आहे. पिंपरीच्या या भयानक घटनेमुळे राज्यात दहशत पसरली आहे.

पिंपरीमध्ये २७ जानेवारी रोजी गुरुवारी ही घटना घडली असून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास घेत, आरोपी शिवम विनोद शेळके याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आरोपी मुलीने शिवम शेळके याच्या विरोधात छेडछाडीची तक्रार पोलिसांत केली होती. त्यामुळे शिवमने या मुलीच्या डोक्यात हातोड्याने घाव घालत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

पिंपरीमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी निषेध केला आहे.

पाहा हा व्हिडिओ : 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number