Yavatmal Crime : यवतमाळ हादरलं! 6 महिन्यात तब्बल 36 आदिवासी महिला बेपत्ता; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

यवतमाळ जिल्ह्यातून मागील सहा महिन्यांत तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Yavatmal Crime : यवतमाळ हादरलं! 6 महिन्यात तब्बल 36 आदिवासी महिला बेपत्ता; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात मागील सहा महिन्यांत तब्बल 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्या असून या सर्व अल्पवयीन मुलींचा वापर परराज्यात विक्री करणे, देह व्यापारासाठी, तसेच मानवी तस्करीसारखा गंभीर प्रकार करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी केला आहे.

यासंदर्भात एका मुलीची व तिच्या प्रियकराशी संबंधित मराठी भाषेतील व्हिडिओ क्लिप समोर आल्याचा दावा असून, त्यात मुलींना फूस लावून तस्करी कशी केली जाते याबाबत माहिती दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. या क्लिपची सत्यता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. जय महाराष्ट्रा न्यूज चॅनेल या क्लिपची पुष्टी करत नाही. विशेष म्हणजे, हा प्रकार आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या मतदारसंघात घडत असल्याने “आदिवासी मुलीच असुरक्षित आहेत का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा- Crime News: भयंकर! मुलाच्या उपचारासाठी गेलेल्या महिलेवर मांत्रिकाकडून सामूहिक अत्याचार; गुंगीचे औषध पाजलं अन्…

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण तसेच तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक थोरात यांची भेट घेतली. तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सखोल तपास तात्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मंत्री अशोक उईके यांनी थेट राळेगाव पोलीस ठाण्यात भेट देत पोलीस उपविभागीय अधिकारी बन्सल व पोलीस निरीक्षकांशी सविस्तर चर्चा केली.

या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून राळेगाव येथील मजहर कुरेशी याचे नाव समोर आले असून त्याला तेलंगणात पळून जात असताना पुन्हा पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीला मदत केल्याचा आरोपही करण्यात येत असून, संबंधित अधिकाऱ्यांना तपासातून दूर करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणात जातीने लक्ष घालावे, तपास जलद व प्रभावीपणे करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number