Sangli News : सांगलीतील अजब प्रकार! विहिरीतून पाण्याऐवजी वाहू लागलं पेट्रोलसदृश्य द्रव, काडीपेटी ओढताच घडली थरारक घटना

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीतून पाण्याबरोबर चक्क पेट्रोलसदृश्य द्रव बाहेर येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

Sangli News :  सांगलीतील अजब प्रकार! विहिरीतून पाण्याऐवजी वाहू लागलं पेट्रोलसदृश्य द्रव, काडीपेटी ओढताच घडली थरारक घटना

सांगली :  सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीतून पाण्याबरोबर चक्क पेट्रोलसदृश्य द्रव बाहेर येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.  गावात घडलेल्या या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उमदी येथील दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीच्या पाण्यात गेल्या वर्षभरापासून पेट्रोलसदृश्य वास येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पाण्यावर पेट्रोलसदृश्य पदार्थ स्पष्टपणे दिसून येत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. विहिरीतील पाणी शेतात सोडण्यात आले असता, त्या पाण्याच्या ठिकाणी काडीपेटी ओढल्यावर आग लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. ज्या ठिकाणापर्यंत पाणी गेले होते, त्या भागातही जाळ जाणवल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा-CRIME : 'लेकरं माझी गेली गं'! एकाच चितेवर जुळ्या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार; फरशीवरील 'ती' गोष्ट ठरली मृत्यूचं कारण

या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्यांचे पती बाबुराव सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मंडळ अधिकारी सैफान जातगार, ग्राम महसूल अधिकारी राजू इंगळे यांच्यासह ग्रामस्थांनी विहिरीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश्य उग्र वास येत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले

विहिरीत पेट्रोल कसे पोहोचले?
दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विहिरीसमोरील पेट्रोल पंपाचीही पाहणी केली. पेट्रोल पंपातून काही प्रकारचे पेट्रोल किंवा इंधन गळती होऊन ते विहिरीच्या पाण्यात मिसळले आहे का, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून वरिष्ठ पथक घटनास्थळी पाठवून सखोल पाहणी व तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली. विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश्य पदार्थ आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, प्रशासनाने तातडीने या पाण्याची शास्त्रीय तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. नेमके पेट्रोल की अन्य ज्वलनशील पदार्थ? याबाबत प्रशासनाच्या तपासणीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहॆ.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number