सनाच्या खुनाचा धक्कादायक खुलासा

नागपूर, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: भाजपाच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकारी सना खान यांच्या खून प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पप्पू ऊर्फ अमित शाहू आणि त्याची गॅंग सनाच्या माध्यमातून लोकांचे अवघडलेल्या स्थितीतील छायाचित्र मिळवायचे आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचे. पप्पूने सना खानच्या या व्हिडिओंचा वापर करीत, त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यासाठी दबाव टाकला. या रॅकेटच्या माध्यमातून […]

सनाच्या खुनाचा धक्कादायक खुलासा

नागपूर, २१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: भाजपाच्या अल्पसंख्यांक सेलच्या पदाधिकारी सना खान यांच्या खून प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पप्पू ऊर्फ अमित शाहू आणि त्याची गॅंग सनाच्या माध्यमातून लोकांचे अवघडलेल्या स्थितीतील छायाचित्र मिळवायचे आणि त्यानंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी करायचे. पप्पूने सना खानच्या या व्हिडिओंचा वापर करीत, त्यांच्याकडून पैशाची मागणी करण्यासाठी दबाव टाकला. या रॅकेटच्या माध्यमातून शाहूने मोठी संपत्ती जमवली होती. सना खानच्या माध्यमातून अमित शाहू ‘सेक्सटोर्शनचे रॅकेट’ चालवीत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. सना खान या गॅंगशी मार्च २०२१ मध्ये जोडली गेली होती.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात नेमके कोणाला ओढायचे हे पप्पू त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती पाहून ठरवत असे. त्यानंतर सनाच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीसोबतचे अवघडलेल्या स्थितीतील छायाचित्र मिळाल्यानंतर शाहू व त्याच्या गँगमधील सदस्य पीडीत व्यक्तीला फोन करून पैशांची मागणी करत असे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number