बिहार, ५ मे २०२३ प्रतिनिधी: बिहारमधील भागलपूरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल रविवारी (दि. ४ जून) कोसळला. वर्षभरापूर्वी याच पुलाचा एक एक स्लॅपही कोसळला होता. पुलाच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाला असून त्याचाच परिणाम म्हणून हा पूल गंगा नदीत पडला असा आरोप केला जात आहे. पुलाचे तीन खांबही नदीत बुडाले. आता या घटनेची चौकशी करण्याची घोषणा बिहार सरकारने केली आहे.
या दुर्घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा पूल गेल्या वर्षीही पडला होता. या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट एसपी सिंगल यांच्याकडे कंपनीकडे देण्यात आलेले आहे. २०१४ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या पुलाची पायाभरणी करण्यात आली होती. २०१५ पासून पुलाचे बांधकाम सुरू झाले.
हा पूल अगुवानी-सुलतानगंज मार्गावर गंगा नदीवर पूल बांधण्यात येत आहे. ४ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा पूल अचानक कोसळला. सुदैवाने यात एकही जीवित हानी झालेली नाही त्यामुळे पुलावर एकही मजूर नव्हता. हा पूल अचानक गंगेत पडल्याने नदीत प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाटा उसळल्या.