जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
11 सप्टेंबरला दुपारी शिवसेना कर्जमुक्तीचा तिसरा टप्पा पार पडणार आहे.
दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करा अशी मागणी या आंदोलनात करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात उद्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदेखील देण्यात येईल.
कर्जमुक्तीची घोषणा करून 3 महिने झाले तरी अद्याप शेतकरी कर्जमुक्त नाही. याचा जाब याआधीही दोनदा शिवसेनेनं सरकारला विचारला होता. उद्यादेखील असाच प्रश्न घेऊन शिवसेना नेते आणि मंत्री मुख्यंमंत्र्यांची भेट घेणार आहेत.