जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राजकारणात चांगलेच सक्रीय आहेत. पण आता उद्धव ठाकरेंचे आणखी एक सुपुत्र राजकारणात सक्रीय होतात की काय?, असा प्रश्न पडतोय. त्याला कारण म्हणजे आजच्या सामना वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांचा फोटो झळकलाय.
युवासेनेने विद्यापीठातील निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देणारी ही जाहिरात आहे. या जाहिरातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली तेजस ठाकरे यांचा फोटो प्रसिद्ध कऱण्यात आलायं. आता या प्रसिद्ध झालेल्या फोटोमुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक चेहरा लवकरच राजकारणात सक्रीय होतोयं की काय, अशी चर्चा आता रंगू लागलीय. हे सत्त्यात उतरेल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.