पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी संसदेत राफेलचे समर्थन केलं.
राफेल प्रकरणी उगाच विरोधकांना दोष का देता ?
‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे.
विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील! बाके बडवल्याने सत्य मरेल काय ?
असा सवाल करत आपल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर घणाघात केला आहे.
काय म्हटलयं अग्रलेखात?
- जाहीर सभेत झोडपाझोडपी करावी अशाच थाटाचे भाषण पंतप्रधान मोदी संसदेत करतात.
- पंतप्रधानांच्या प्रत्येक वाक्यावर त्यांच्या पक्षाचे लोक बाके बडवीतात. बाके बडवल्याने सत्य मरते का ?
- राफेल प्रकरणात मोदींचा सहभाग सिद्ध करणारा एक नवा दस्तऐवज बाहेर आला आहे.
- हे काळे पान समोर आल्याने बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणार्यांची तोंडे त्यामुळे बंद झाली.
- राफेलवरून राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचे काय?
- ‘सत्यमेव जयते’ हाच देश जिवंत ठेवण्याचा मंत्र आहे.उगाच विरोधकांना दोष का देता?
- विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील, असे शिवसेनेने म्हटंले आहे.
- ‘चौकीदार चोर है’ हा नारा देशाच्या कानाकोपर्यांत पोहचण्यास राफेल प्रकरणातली लपवाछपवी कारणीभूत आहे.
- पाचशे कोटींचे राफेल विमान सोळाशे कोटींना विकत घेण्यामागचा तर्क काय?
- राजकारणात तळे राखी तो पाणी चाखी हे मान्य, पण येथे समुद्रच गिळला जात आहे.
- जोपर्यंत या प्रकरणी समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत नागरिक प्रश्न विचारत राहणार आहेत.