जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
आवाज कुणाचा म्हणत मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसेनेचा आज 51 वा वर्धापन दिन. मुंबईतच नाही तर राज्यातही आज शिवसेनेचा आवाज घुमताना दिसले. परंपरेप्रमाणे शिवसेनेचा वर्धापन दिन आज साजरा होईल.
मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमधल्या या सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही यावेळी उपस्थित असतील. प्रखर हिंदुत्व आणि मराठी माणसाचा झेंडा खांद्यावर घेऊन गेली पाच दशकं शिवसेनेनं आवाजा दाखवून दिला.
शिवसेनाप्रमुखांचा 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा वसा घेणाऱ्या शिवसेनेसमोर भाजपनंही मोठं आव्हान निर्माण केलं. त्यामुळे आज शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं.