Shivsena Opration Tiger : एकीकडे ठाकरेंची मनधरणीची रणनीती, तर दुसरीकडे शिंदेंचा 6 खासदारांना कॉन्फरन्स कॉल; 30 मिनिटांच्या चर्चेत काय झालं?

काल एकनाथ शिंदे यांनी फोनवरून सहा खासदारांना संपर्क साधला असून काल फोनवरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या सहा खासदारांसोबत अर्धा तास चर्चा केली.

Shivsena Opration Tiger : एकीकडे ठाकरेंची मनधरणीची रणनीती, तर दुसरीकडे शिंदेंचा 6 खासदारांना कॉन्फरन्स कॉल; 30 मिनिटांच्या चर्चेत काय झालं?

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात 4 वर्षांनी पुन्हा एकदा बंडाची पुनरावृत्ती झाली आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंसह तब्बल 40 आमदारांनी जे केलं तेच आता ठाकरेंच्या 6 खासदारांनी केल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी बंड पुकारत आपला वेगळा गट स्थापन केला असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला अधिकृत मंजुरीही दिली आहे. 

याचपार्श्वभूमिवर काल संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांनी भाजपकडे 2029 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळावं असं आश्वासन मागितलं होत. हे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत दोन्ही खासदारांनी पाठिंब्याच्या पत्रावर सही केली नसल्याचे समोर आले होते. मात्र याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काल एकनाथ शिंदे यांनी फोनवरून सहा खासदारांना संपर्क साधला असून काल फोनवरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या सहा खासदारांसोबत अर्धा तास चर्चा केली.

हेही वाचा- Shivsena UBT: मोठी बातमी! बंडखोर खासदारांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न; ठाकरेंच्या ‘या’ बड्या नेत्याचे नाव समोर

एकनाथ शिंदे हे काल दिल्लीहून परत आले असून खासदारांसोबत अर्धा तास फोनवर संपूर्ण दिवसभराबद्दल आणि आजच्या घडामोडींबद्दल चर्चा केली असल्याची माहिती आहे. तसेच  हे सर्व ऑपरेशन गोपनिय पद्धतीने राबवण्याची दिल्लीत श्रीकांत शिंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी श्रीकांत शिंदे दिल्लीत ठाण मांडून आहेत.

त्यामुळे ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याचे शिवसेनेकडून शिक्कामोर्तंब करण्यात आहे. 19 तारखेला वर्धापन दिना औपचारीक घोषणा होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. टेक्निकल आणि कायदेशिर बाजू तपासून शिवसेना या सहा खासदारांच्या पक्ष प्रवेशाची अधिकृत घोषणा करणार असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांना दिल्लीत ऑपरेशन टायगर यशस्वी रित्या राबवण्यात यश आलं असून शिवसेनेच्या सर्व 6 खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतून बाहेर हलवल्याची सुत्रांची माहीती आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number