जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सर्वसामान्य जनतेला नोटाबंदीचा त्रास झाल्याची कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
गडकरींच्या या वक्तव्याबाबत सामनातून त्यांचं अभिनंदन करण्यात आले. नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. हे गडकरींनी मान्य करून गरीबांवर उपकार केलं असल्याचं सामनातून सांगण्यात आले.
काय म्हंटलय सामनात
– नोटाबंदीमुळे श्रीमंतांचे अजिबात नुकसान झाले नाही
– काळा पैसा पांढरा करण्याचाच तो एक डाव होता आणि त्यात काही मोजक्या धनाढ्य मंडळींची कशी चांदी झाली
– त्यातून काही मंडळींच्या संपत्तीची कशी भरभराट झाली हे आता उघड झाले आहे
– नोटाबंदीचा फियास्को होणारच होता
– गरीब त्यात भरडले गेले आहेत
– नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत
– आम्ही परखड गडकरींचे अभिनंदन करीत आहोत