जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी
नाणार इथल्या प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेची डोंगर तिठा गावात सभात झाली. रिफायनरी प्रकल्पाविरोधात खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली सभा झाली.
या सभेत लँड माफियांची नावं राऊत यांनी जाहीर केली. गुजरातच्या लँड माफियांसाठीच नाणारच्या रिफायणरीचा सरकारने घाट घातला असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच या परिसरात गुजरातच्या लँड माफियांचा सुळसुळाट झाला असून, जवळपास दोन हजार एकर जमीन गुजरातच्या लँड माफियांनी कवडीमोल दराने विकत घेतलीय असा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला होता. दरम्यान भू माफियांची नावं राऊत यांनी जाहीर केली.