‘त्याचा’ पुरावा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू; शिवसेनेचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेच्या खासदारांनी पलटवार केलाय. कोकणात हा प्रकल्प आणण्यासाठी शिवसेना खासदारांनी आग्रह केला, हा दावा करणारे मुख्यमंत्री धादांत खोटे बोलताहेत, असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री अनंत गितेंनी केलाय. रिफायनरी कोकणात आणण्यासाठी यापूर्वी कोणतीही बैठक झाली नाही, असा राऊत आणि गितेंनी केलाय. विनायक राऊत यांनी […]

‘त्याचा’ पुरावा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू; शिवसेनेचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेनेच्या खासदारांनी पलटवार केलाय. कोकणात हा प्रकल्प आणण्यासाठी शिवसेना खासदारांनी आग्रह केला, हा दावा करणारे मुख्यमंत्री धादांत खोटे बोलताहेत, असा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री अनंत गितेंनी केलाय.

रिफायनरी कोकणात आणण्यासाठी यापूर्वी कोणतीही बैठक झाली नाही, असा राऊत आणि गितेंनी केलाय. विनायक राऊत यांनी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, मुख्यमंत्री खोटे बोलत असल्याचे पुरावे दिले आणि प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली.

तसंच शिवसेना खासदारांनी मागणी केल्याचा पुरावा न दिल्यास मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू असा इशारा त्यांनी दिलाय.

दरम्यान, ‘जय महाराष्ट्र’नं याआधी याप्रकरणी विशेष कार्यक्रम देखील केला होता. ‘जय महाराष्ट्र’ याबातमीचा वेळोवेळी पाठ-पुरावा करतंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number