‘बुरे दिन’ परत आणा; शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ‘अच्छे दिन’चं आश्वासन पाळू शकत नसाल तर आमचे आधीचे ‘बुरे दिन’ परत आणा, ते बरे होते अशी खोचक टीका शिवसेनेने ‘सामना’तून केली.   पंतप्रधान देशाला बुलेट ट्रेन द्यायला निघाले आहेत. पण, लोकांना त्यांच्या वाहनांमध्ये दोन लीटर पेट्रोल भरणे कठीण झाले आहे.   एका बाजूला श्रीमंतांसाठी बुलेट ट्रेन धावेल व दुसऱ्या […]

‘बुरे दिन’ परत आणा; शिवसेनेचे भाजपवर टीकास्त्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

‘अच्छे दिन’चं आश्वासन पाळू शकत नसाल तर आमचे आधीचे ‘बुरे दिन’ परत आणा, ते बरे होते अशी खोचक टीका शिवसेनेने ‘सामना’तून केली.

 

पंतप्रधान देशाला बुलेट ट्रेन द्यायला निघाले आहेत. पण, लोकांना त्यांच्या वाहनांमध्ये दोन लीटर पेट्रोल भरणे कठीण झाले आहे.

 

एका बाजूला श्रीमंतांसाठी बुलेट ट्रेन धावेल व दुसऱ्या बाजूला पेट्रोल-डिझेल परवडत नाही म्हणून लोक बैलगाड्यांवरून प्रवास करतील अशा शब्दांत सेनेने मोदी सरकावर टीका केली. हे सर्व मूकपणे व उघड्या डोळ्यांनी पाहणारेच राष्ट्राचे शत्रू व जनतेचे बेईमान आहेत असंही शिवसेनेने यावेळी म्हटल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number