जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेनेचे नेते अरुण दुधवाडकर यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत दुधवाडकर यांनी भाजप आणि राणेंना चांगलाच टोला लगावला.
शिवसेनेच्या वाट्याचे मंत्रीपद अडवण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची ताकद नसल्याची टीका शिवसेनेचे नेते अरूण दुधवाडकर यांनी केलीय.
उद्धव ठाकरेंच्या कोल्हापूर दौऱ्याची महिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील एकही नेता भाजपच्या गळाला लागणार नसल्याचंही दुधवाडकर यांनी म्हटलंय. भाजप बरोबर त्यांनी राणेंवरही प्रहार केलाय.